प्रभा गणोरकर - लेख सूची

जगावेगळे

(विदर्भातील तत्त्ववेत्ते व विचारवंत दि.य. देशपांडे ह्यांनी आपल्या विदुषी पत्नी मनू गंगाधर नातू ह्यांच्या प्रथम स्मृतिदिनी आजचा सुधारक ह्या विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या मासिकाची मुहूर्तमेढ रोवली त्याला आता पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने ह्या जगावेगळ्या दांपत्यावरील, लोकमत २०१४ च्या दिवाळी अंका पूर्वप्रकाशित झालेला हा लेख – का.सं.) गोष्ट खूप जुनी आहे. पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वीची म्हणजे …

स्त्रीच्या दुःखाचा शोध घेणाऱ्या समाजव्यवस्थेची मीमांसा

‘संदर्भासहित स्त्रीवाद’ हा सुमारे ५८० पृष्ठांचा बृहत् -ग्रंथ प्रकाशित होणे ही एक अत्यंत स्वागतार्ह घटना आहे. हा ग्रंथ ‘विद्या बाळ कार्यगौरव ग्रंथ’ आहे आणि याची आखणी, यात समाविष्ट लेखांची मौलिकता आणि दर्जा, याने कवेत घेतलेले चर्चाविश्व यासाठी प्रथम या ग्रंथाच्या संपादकत्रयींचे मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे. ‘मिळून साऱ्याजणी’च्या संस्थापक आणि स्त्रीप्रश्नांचा सार्वत्रिक वेध घेत चळवळीला महाराष्ट्रात …

सुशीलेचा देव: एक टिपण

‘सुशीलेचा देव’ ही कादंबरी पुन्हा वाचताना या कादंबरीत सुशीलेच्या आणि इतर पात्रांच्या देवविषयक कल्पनांच्या बाबतीतली क्रांती दाखवणे हा वामन मल्हारांचा या कादंबरीच्या लेखनामागचा हेतू खरोखरीच आहे का असा प्रश्न पडला. सुशीला हे या कादंबरीतले मध्यवर्ती पात्र. बाळू, सुनंद, रावबा हे तिचे बाळपणापासूनचे. सवंगडी, विनायकराव हे सुशीलेचे वडील आणि गिरिधरराव हे विबाचे वडील. ही कादंबरीतली पात्रे …

“बाई”

सुमारे ३० वर्षापूर्वी मी नातूबाईंना प्रथम पाहिले. “वाचक पाहिजे” अशी जाहिरात त्यांनी दिली होती. मला शिक्षण घेता घेता करण्याजोगे काही काम हवे होते. त्यांच्या खोलीत मी प्रवेश केला तेव्हा खोलीत काळोख होता. पडदे सरकवलेले होते. पंखा मंद सुरू होता आणि हाताशी असलेल्या आटोपशीर स्टुलावर डोके खाली केलेला टेबललॅम्प जळत होता. बाई पलंगावर किंचित रेलून, विसावून …